दुष्ट, धूर्त, कावेबाज इंग्रजांविरोधात लढता लढता देशपातळीवर मोठे जन आंदोलन उभारण्यासाठी अनेक ठिकाणी लोकांना ओरडून ओरडून संबोधताना टिळकांना फुफ्फुसांचा आजार जडला.. त्यावेळेस आता सारखे मुबलक प्रमाणात ध्वनिक्षेपक नव्हते. लोकांना संबोधताना मोठ्या आवाजातच बोलावे लागायचे. गर्दीत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीला सुद्धा आवाज ऐकायला जायला हवा हा प्रयत्न असायचा.. आणि इथेच घात झाला. टिळकांना फुफ्फुसांचा आजार जडला. लोकांनी सांगून, विनवण्या करूनही टिळक थांबले नाहीत. सभा घेतच राहिले. परकीय शत्रूंच्या विरोधात स्वकीयांना संघटित करत राहिले. लोकांना संबोधत राहिले. उगाच नाही ते #लोकमान्य झाले.

त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उभारलेला लढा अंतिम टप्प्यात आला असतानाच तो दुर्भाग्यपूर्ण दिवस उजाडला आणि भारताची सिंहगर्जना थांबली. टिळक स्वर्गवासी झाले.

आज १ ऑगस्ट... टिळकांचा स्मृतिदिन. टिळक महाराजांच्या चरणी मनःपूर्वक वंदन...


(श्री क्षेञ सोमेश्वर मंदीर)
         नेर परसोपंत मधे अभिमान वाटेल असे श्री शंभू महादेवाचे पूरातन व अतिप्रचिन हेमाड पंथी पाषाणात कोरलेले श्री क्षेञ सोमेश्वर मंदीर आहे. परकिय क्षञूंपासून सौरक्षण व्हावे म्हणून अनेक वर्षापासून हे मंदिर मातीच्या गढी खाली झाकून ठेवण्यात आले होते. सन 1902 मधे गावकर्यांनी हे मंदिर बाहेर काढले. मंदिराचे अत्यंत प्राचीन ,काळ्या पाषाणात सूबक कोरीव काम केलेले आहे. प्रत्येकानी नजरेत साठवून ठेवाव असे हे मंदीर आहे गेले 30 ते 35 वर्षापासून हे मंदिर सरकारी पूरातत्व विभागाकडे आहे

मंदिराचा कही भाग पडक्या अवस्थेत आहे याचे बाधकाम व सौदर्यीकरण व्हावे अशी सर्वच गावकर्यांची इच्छा आहे . मंदिर माहिती मला नेर परसोपंतचे गाढ ज्ञान असलेले माझी सरपंच विलासरावजी राखडे यांच्या कडून मिळाली. माझ्या कूंचल्यातून मंदिराचा व नेर परसोपंतचा उद्धार झाला तर अभिमान वाटेल मला माझ्या कूंचल्यांचा.
( विस्तृत आणि संग्रहित माहिती )