दुष्ट, धूर्त, कावेबाज इंग्रजांविरोधात लढता लढता देशपातळीवर मोठे जन आंदोलन उभारण्यासाठी अनेक ठिकाणी लोकांना ओरडून ओरडून संबोधताना टिळकांना फुफ्फुसांचा आजार जडला.. त्यावेळेस आता सारखे मुबलक प्रमाणात ध्वनिक्षेपक नव्हते. लोकांना संबोधताना मोठ्या आवाजातच बोलावे लागायचे. गर्दीत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीला सुद्धा आवाज ऐकायला जायला हवा हा प्रयत्न असायचा.. आणि इथेच घात झाला. टिळकांना फुफ्फुसांचा आजार जडला. लोकांनी सांगून, विनवण्या करूनही टिळक थांबले नाहीत. सभा घेतच राहिले. परकीय शत्रूंच्या विरोधात स्वकीयांना संघटित करत राहिले. लोकांना संबोधत राहिले. उगाच नाही ते #लोकमान्य झाले.
त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध उभारलेला लढा अंतिम टप्प्यात आला असतानाच तो दुर्भाग्यपूर्ण दिवस उजाडला आणि भारताची सिंहगर्जना थांबली. टिळक स्वर्गवासी झाले.
आज १ ऑगस्ट... टिळकांचा स्मृतिदिन. टिळक महाराजांच्या चरणी मनःपूर्वक वंदन...